Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
Jul 11
एक काळ होता जेव्हा
मी वर्गात पहिला यायचो,
सगळ्यात A ग्रेड मिळवायचो तेव्हा,
आनंदाने पेढा खायचो

शिकवलेले कळायचे मला सगळं,
विषय सगळे आवडायचे
खेळ खेळायचो वेगवेगळे,
शिक्षक सर्व मुलांना घडवायचे

आज मी वर्गात पहिला येत नाही,
नाही खात मी पेढा
शिकवलेलं कळत नाही काही,
कमी गुणांनी घातलाय वेढा

विषय नाहीत आवडत मला,
कलेला नाही आहे वाव
शिक्षक डोकं खातात साला,
फक्त मार्कांनाच आहे भाव

पण येतील ते दिवस पुन्हा,
जेव्हा मीच पहिला येईन
खूप गुण मिळतील तेव्हा,
मी पुन्हा पेढा खाईन

चारही बाजूंनी असेल वाहवा माझी,
खूप मोठं असेल माझं नाव
कीर्ती पसरलेली असेल माझी अशी,
की असेल फक्त माझाच बडेजाव
ही कविता २० फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
Yash Shukla
Written by
Yash Shukla  23/M/Pune
(23/M/Pune)   
Please log in to view and add comments on poems