Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
Yash Shukla Jul 11
विश्वासाने बनते नाते,
नाते असते माणुसकीचे,
नाते असते प्रेमाचे तर,
नाते असते आपुलकीचे.
नात्यामध्ये नसते खोट,
नात्यामध्ये असतो विश्वास,
एकमेकांचे हात धरुनी
करूया आयुष्याचा प्रवास.

मदत करूया एकमेकांची,
सांभाळून घेऊ आपण चुका,
अडचणींच्या सागरातून होईल
पार संसाराची नौका.
अडचणींवर मात करुनी
घेऊया सुटकेचा निश्वास,
प्रेमाच्या सरी कोसळतील जर
तुझा असेल माझ्यावर विश्वास.
ही कविता २० मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
Yash Shukla Jul 11
जगात एकटेच येता,
जगातून एकटेच जाता,
मग आयुष्यात तुम्ही कोणावर
कशाला अवलंबून राहता?

इथं कोणीच नसतं कोणाचं,
"तो आहे माझा..." असं फक्त म्हणायचं,
मदतीला मात्र कोणीही येत नाही,
सगळे बघतात फक्त आपल्याच फायद्याचं.

जग आहे अतिशय वाईट,
सगळेच म्हणतात "नो मोअर फाईट",
मग समोर येतात वाईट बातम्या –
"... वॉस किल्ड लास्ट नाईट."

बायकांना दिला जातो त्रास,
लोकांना मारणं समजलं जातं खास,
कधी वाटतं संपून जावं सगळं,
थांबून जावा एकसाथ सगळ्यांचा श्वास.
ही कविता १८ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
Yash Shukla Jul 11
"गो कोरोना" म्हणत म्हणत,
आले रस्त्यावर आठवले
शाळांना सुट्ट्या दिल्यानंतर,
सगळ्यांनी गाव गाठले

सरकारने केलं आव्हान सर्वांना —
"घराबाहेर पडू नका!"
बाहेर पडायचंच असेल तुम्हाला,
चेहरा तुमचा मास्कने झाका

मुंबईत झाली जमावबंदी,
झाले सगळे सोहळे रद्द
गर्दीत प्रवास करायला लोकांना,
लावण्यात आले निर्बंध

झाली बंद थिएटर, जिम,
लोकं राहायला लागली घरात
कोरोनाला रोखण्यासाठी मात्र,
तयारी चाललीये जोरात

कोरोनाने पाडलं स्टॉक मार्केट,
सोन्याचे भाव पण पडले
लोकांच्या भीतीमुळे मात्र,
मास्कचे भाव वाढले

कोणाचे गेले आईवडील,
कोणी पाहिलं मुलाला मरताना
कोरोनाच्या विळख्यातून वाचव —
हीच देवाचरणी प्रार्थना
ही कविता १६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
Yash Shukla Jul 11
कसं सांगू तुला,
मनात काय चाललंय
ज्वालामुखीचा उद्रेक झालाय,
सारं आभाळ फुटलंय

भावना पुरात गेल्यात वाहून,
प्रेमाचा पडलाय दुष्काळ
द्वेषाच्या वादळाच्या थैमानाने,
दुःखाचा पडलाय सुकाळ

तू नाकारून मला,
खूप मोठी चूक केलीस
माझ्या प्रेमाच्या चिंध्या करून,
तू निघून गेलीस

दुःखाच्या वादळाचा झटका,
नक्कीच बसेल तुला
आयुष्यात द्वेषाच्या सुनामीनंतर,
प्रेमाचं महत्त्व कळेल तुला
ही कविता ०६ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
Yash Shukla Jul 11
वाट पाहिलेली तिजी मी,
पण ती नाही आली
खिडकीत दिसलेली ती शेवटची,
परत दिसलीदेखील नाही

कित्तीएक वर्षं गेली आता,
आता गेलाय खूप काळ
तिच्या आठवणींचा मात्र,
मी केलाय सांभाळ

कुठे असेल आत्ता ती?
ह्या प्रश्नानं दिला त्रास
चेहऱ्यावर आहे हसू,
पण आतून आहे मी उदास

विचारलेलं तिच्याबद्दल,
चौकशी खूप केलेली
कुणास ठाऊक, कुठल्या शहरात,
होती ती हरवलेली

तिच्या आठवणीने खूप त्रासलोय,
नाही मला सुचत काही
म्हणूनच कदाचित परत विचारतोय —
कुठे असेल आत्ता ती??
ही कविता ०४ मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
Yash Shukla Jul 11
एक काळ होता जेव्हा
मी वर्गात पहिला यायचो,
सगळ्यात A ग्रेड मिळवायचो तेव्हा,
आनंदाने पेढा खायचो

शिकवलेले कळायचे मला सगळं,
विषय सगळे आवडायचे
खेळ खेळायचो वेगवेगळे,
शिक्षक सर्व मुलांना घडवायचे

आज मी वर्गात पहिला येत नाही,
नाही खात मी पेढा
शिकवलेलं कळत नाही काही,
कमी गुणांनी घातलाय वेढा

विषय नाहीत आवडत मला,
कलेला नाही आहे वाव
शिक्षक डोकं खातात साला,
फक्त मार्कांनाच आहे भाव

पण येतील ते दिवस पुन्हा,
जेव्हा मीच पहिला येईन
खूप गुण मिळतील तेव्हा,
मी पुन्हा पेढा खाईन

चारही बाजूंनी असेल वाहवा माझी,
खूप मोठं असेल माझं नाव
कीर्ती पसरलेली असेल माझी अशी,
की असेल फक्त माझाच बडेजाव
ही कविता २० फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
Yash Shukla Jul 11
तू दिसतेस मला एका फुलासारखी,
वेगवेगळ्या रंगांनी बहरलेली
तू दिसतेस मला एका ताऱ्यासारखी,
दूर आकाशात टीमटीमणारी

प्रेम आहे माझे तुझ्यावर,
तुला माहीत नाही
तू आणि फक्त तूच दिसतेस,
इतर काहीच दिसत नाही

एक दिवस विचारेन तुला —
"माझ्याशी लग्न करशील का?"
तेव्हा तू म्हणू नकोस की,
"माझ्या आयुष्यातून निघून जा"

नाही जगू शकणार तुझ्याशिवाय,
जाईन मी मरून
पण आठवणी मात्र राहतील तुझ्या,
मनात घर करून

तू सुखी राहावीस,
हीच असेल माझी शेवटची इच्छा
तुझ्या सुखी जीवनाला,
माझ्याकडून शुभेच्छा
ही कविता १४ फेब्रुवारी २०२० रोजी लिहिलेली आहे.
Next page